महात्मा फुले यांचे धर्मविषयक विचार आणि कार्य: आधुनिक प्रासंगिकता

लेखक

  • सिमा सूर्यभान जाधव, डॉ. गोपालसिंह बछिरे

##semicolon##

https://doi.org/10.8224/journaloi.v74i2.895

सार

महात्मा ज्योतिराव फुले हे उन्नीसाव्या शतकातील क्रांतिकारी समाजसुधारक होते. त्यांनी धर्म, समाज व शिक्षण यांचा सखोल विचार करून नव्या मूल्यांची मांडणी केली. त्यांच्या मते धर्माचा खरा अर्थ केवळ कर्मकांड, देवदेवतांची पूजा किंवा पुरोहितांनी ठरवलेले आचारनियम यात नसून, तो मानवाच्या कल्याणाशी, समानतेशी आणि न्यायाशी निगडित आहे. धर्म हा शोषणाला, विषमतेला व अज्ञानाला प्रोत्साहन देणारा नसून सर्व व्यक्तींना समान संधी देणारा असावा, ही त्यांची धारणा होती. भारतीय समाजात धर्माच्या नावाखाली जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रियांची दुय्यमता आणि अंधश्रद्धा खोलवर रुजली होती. फुले यांनी या सर्व अन्यायकारक प्रथांचा कठोर निषेध केला. त्यांनी दाखवून दिले की वर्णव्यवस्था ही मानवनिर्मित असून ती धर्माशी संबंधित नाही. गुलामगिरी या ग्रंथातून त्यांनी धर्माच्या नावाखाली दलित-शूद्रांवर चालणाऱ्या शोषणाचा पर्दाफाश केला. तसेच शिक्षणाच्या अभावामुळे हे वर्ग अधिकच मागासले राहिले, हे त्यांनी स्पष्ट केले. यासाठीच त्यांनी शूद्र-अतिशूद्र आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा काढल्या. त्यांच्या मते शिक्षण हेच खरे मंदिर, तर ज्ञान हेच खरे पूजनीय दैवत आहे. फुले यांनी स्त्रियांना विशेष स्थान दिले. सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने त्यांनी स्त्रीशिक्षण सुरू केले, जे त्या काळात धर्माविरुद्धचे पाऊल मानले गेले. त्यांनी विधवाशिक्षण, पुनर्विवाह आणि मुलींच्या शिक्षणावर भर दिला. त्यांच्या मते धर्म म्हणजे पुरुषप्रधानता नव्हे तर स्त्री-पुरुष समानता होय.

##submission.downloads##

प्रकाशित

2025-08-16

अंक

खंड

Articles

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##